loader
Breaking News
Breaking News
Foto

फरारे (मोगरेवाडी) संपूर्ण गावाचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश

खेड (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील फरारे (मोगरेवाडी) येथून संपूर्ण वाडीने तसेच शेकडो पदाधिकार्‍यांनी महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास, पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम आणि शिवसेनेचे उपनेते व आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घरवापसी केली. आपल्या एकीचे हे बळ आणि शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासाभिमुख नेतृत्व आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचा विश्वासाच्या बळावर आपण दापोली आणि कोकणात हा शिवसेनेचा भगवा अविरत फडकत ठेऊ असा विश्वास यावेळी सर्वांना दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाऊसाहेब मोहिते माजी उपनगराध्यक्ष, उबाठा गट, अविनाश मोहिते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सदस्य, माजी नगरसेवक, स्वप्नील मयेकर शहर संघटक, उबाठा, शैलेश कासारे जिल्हा सरचिटणीस, कॉंग्रेस, अनंत पाटीलसह सचिव, उबाठा (दापोली), प्रकाश पामागुरव उपसचिव, उबाठा(मुंबई कार्यकर्ता) या सर्वांचे व यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांचे शिवसेना परिवारात मन:पूर्वक स्वागत केले. यावेळी उपस्थित उपनेते आमदार संजय कदम, माजी जि.प.बांधकाम सभापती अण्णा कदम, किशोर देसाई (विधानसभा क्षेत्र प्रमुख), प्रकाश कालेकर (विधानसभा संघटक), तालुकाप्रमुख उन्मेश राजे, नीलेश शेठ, ममता शिंदे, नगरसेवक अंकुश विचारे, सुनिल साळोखे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg