loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. अनिकेत मयेकर यांच्या ’स्टेथोस्कोप’ ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन

रत्नागिरी : ‘स्टेथोकोप’ म्हणजे डॉक्टरांच्या माणूस म्हणून जगण्याच्या अनुभूतीतून माणसांवर प्रेम करणार्‍या माणसाकडून माणसांशी एकरूप होऊन साकारलेले पुस्तक : पौर्णिमा केरकर अस्नोडा : डॉ. अनिकेत मयेकर यांच्या ’स्टेथोस्कोप’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच झाले. सोनचाफा प्रकाशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लोकसंस्कृतीच्या अभ्यासक पौर्णिमा केरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर सोनचाफा प्रकाशनच्या स्नेहा सुतार, लेखक डॉ. अनिकेत मयेकर उपस्थित होते. ‘स्टेथोस्कोप’ हा लेखसंग्रह डॉ. अनिकेत मयेकर यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांवर आधारित आहे. या लेखसंग्रहात त्यांनी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील भावनिक बंधाचे सुंदर चित्रण केले आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक सामाजिक आणि नैतिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. पौर्णिमा केरकर यांनी आपल्या भाषणात डॉ. मयेकर यांच्या लेखनाची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, स्टेथोस्कोप या पुस्तकात जगण्याविषयीचा सातत्याने केलेला भावनिक सखोल विचार डॉ. मयेकरांच्या लेखांमधून दिसतो आणि त्यामुळे हे पुस्तक जास्तीत जास्त वाचकांनी आवर्जून वाचायला हवे. क्लिष्ट डॉक्टरी भाषेत दिवसभर वावरणार्‍या डॉक्टरांच्या लेखणीतून साध्या सोप्या भाषेमधून सामान्य माणसांच्या हृदयापर्यंत त्यांचा स्टेथोस्कोप पोहोचवण्याची ताकद आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्नेहा सुतार यांनीही ‘स्टेथोस्कोप’ या लेखसंग्रहाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, सोनचाफा प्रकाशनाचे हे पहिलेच पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल. डॉ. मयेकर यांच्या वैद्यकीय अनुभवातून आलेले वाचकांच्या मनाला स्पर्शून जाणारे हे पुस्तक आहे. डॉ. मयेकर यांनी आपल्या मनोगतात ‘स्टेथोस्कोप’ हा लेखसंग्रह लिहिण्यामागची प्रेरणा सांगितली. ते म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात काम करताना मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. समोर आलेले रुग्ण आणि त्यांच्या समस्या, त्यांच्या सुख-दु:खातून हे पुस्तक साकारलेले आहे. यावेळी मैथिली भोसले, सुमन वरंडेकर आणि करण परब यांनी गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी अदिती मयेकर, आनंद मयेकर, सौ. अंजनी मयेकर, विश्वनाथ सुतार, सौ. शीला सुतार यांनी शुभेच्छा दिल्या. आशिष रुमडे यांनी यावेळी सदिच्छापर मनोगत व्यक्त केले. श्रवण यादव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रुती परब यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg