loader
Breaking News
Breaking News
Foto

एस टी कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी उमेश खेडेकर तर उपाध्यक्षपदी अनिल चव्हाण यांची निवड ---

संगलट(खेड)(इक्बाल जमादार)- एस टी कर्मचारी सहकारी पतसंस्था रत्नागिरीच्या अध्यक्षपदी श्री. उमेश खेडेकर आणि माखजन येथील श्री. अनिल चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चिपळूण येथील शिक्षक समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. एस टी कर्मचारी पतसंस्था ही जिल्ह्यातील एक अग्रगण्य कर्मचारी पतसंस्था आहे. खेडेकर हे खेड आगारात वाहक पदी कार्यरत असून त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात चांगला जनसंपर्क आहे. श्री. खेडेकर आणि चव्हाण यांच्या निवडीमुळे रत्नागिरी विभागातील असंख्य कामगारांनी दूरध्वनीवरून व प्रत्यक्षात भेटून त्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजेश मयेकर, सचिव रवी लवेकर, खजिनदार अमित लांजेकर, श्री. बाळाराम सोंडकर, श्री. संदेश सावंत, स्वप्नील सावर्डेकर, विलास जाधव, गुरुनाथ सुर्वे, साईप्रसाद जुवेकर, समीर धावडे, संचालक श्री. राजेंद्र पाटोळे, समीर शिंदे, अभय जूवले, निलेश इंदुलकर, रमेश राठोड, सौ. मनाली साळवी यांसह संघटनेचे विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg