loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा शहर आयोजित क्रिकेटचा १९ व २० एप्रिल रोजी महासंग्राम ---

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा शहर आयोजित १९ व २० एप्रिल रोजी दिवा येथे क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. या स्पर्धेतील विजेता संघाला ३३,३३३/- व उपविजेता संघाला २२,२२२/- रोख रक्कमेसह सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कोकण आणि त्या कोकणातील एक छोटासा खेड तालुका, दिवा शहरांमध्ये राहत असलेल्या समस्त खेडवासियांची हक्काची संघटना म्हणजेच खेड तालुका कोकण रहिवाशी मंच. दिवा शहर संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट २०१७ रोजी कारण्यात आली. संस्थेचे स्वतःचे मालकीचे ऑफिस सुद्धा दिवा नगरीत आहे. आत्तापर्यंत अनेक सामाजिक कार्य संस्थेने या दिव्यात तसेच ग्रामीण भागात अनेक गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सुद्धा वाटप केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संघटनेच्या वतीने क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच टेनिस क्रिकेट स्पर्धा मागच्या वर्षीपासून सुरुवात केली आहे. क्रीडाप्रेमी आणि क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून यावर्षी पर्व दुसरे आपल्याला पाहायला मिळणार आहे. शनिवारी १९ एप्रिल व रविवारी २० एप्रिल या दोन्ही दिवशी सामने ओपन ठेवण्यात आलेले आहेत. शनिवारी १९ एप्रिल रोजी अंतिम विजेती झालेली टीम व रविवारी २० एप्रिल रोजी अंतिम विजेती झालेली टीम यामध्ये रविवारी फायनल खेळविली जाईल. सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि विशेष म्हणजे शिस्तबद्ध संघास सुद्धा विशेष पारितोषिक ठेवण्यात आले आहे. शनिवार/रविवार १९/२० एप्रिल सलग दोन दिवस जवळजवळ २४ टीम खेळवल्या जाणार आहेत. यातील जमेची बाजू अशी की संस्था हे क्रिकेट सामने टाईमपास किंवा विरंगुळा म्हणून आयोजित करत नाही तर यातून आपल्या भावी पिढीच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी विशेष सहकार्य केले जाते. हि अभिमानाची बाब आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg