loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये डॉ. आंबेडकर जयंतीचा ’जल्लोष’ ! जयंतीदिनी लोटला विराट जनसागर ---

खेड(प्रतिनिधी)- भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी शहरातील जिजामाता उद्यानातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खेड तालुक्यातील विविध गावातून अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने खेड शहरात विराट जनसागर लोटला होता. दिवसभर अनेक सामाजिक संस्था पक्ष पदाधिकारी यांनी अभिवादन केले. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे आयोजन जिजामाता उद्यान येथे करण्यात आले होते. या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. जयंतीच्या पूर्वसंध्येला खेड शहरातून कँडल मार्च काढून महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. १४ एप्रिल रोजी सकाळी धम्म ध्वजारोहन स्थानिक अध्यक्ष मंदार हळदे यांच्या हस्ते पार पडले तर बौद्ध पूजा पाठ संस्कार समितीच्या वतीने पार पडले. त्यानंतर खेड शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची आंबेडकर भवन ते जिजामाता उद्यान अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, सावित्रीबाई फुले व तथागत गौतम बुद्ध यांच्या वेशभूषा आकर्षणाच्या केंद्र बिंदू ठरल्या होत्या. दरम्यान या रॅलीनंतर स्वागत समारंभ व जाहीर सभा पार पडली. या सभेला डॉ. प्रा. निर्झरा संदीप गमरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने भोजनदान, तसेच प्रवर्तक सेवा संस्था यांच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले. तसेच खेड तालुका रिपाइंच्या वतीने थंडपेय वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg