loader
Breaking News
Breaking News
Foto

चंद्रनगर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी ---

दापोली- दापोली तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. इयत्ता सातवीतील विद्यार्थी सोहम योगेश मुलूख याच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम साजरा झाला. चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, शिक्षक बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, कार्यक्रम अध्यक्ष सोहम मुलूख यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. शिक्षकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्य व देशाच्या जडणघडणीतील भरीव योगदानाबद्दल सविस्तर विवेचन केले. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते दुसरी, तिसरी ते पाचवी, सहावी ते सातवी अशा तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण, शिक्षण, सामाजिक कार्य, संविधान निर्मितीमधील योगदान, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, जीवनातील अविस्मरणीय प्रसंग आदी विषयांवर आधारित विद्यार्थ्यांची भाषणे झाली. शाळेत सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षकांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज मुलूख, प्रसाद शिगवण, अथर्व रांगले या विद्यार्थ्यांनी केले. मंजिरी पवार या विद्यार्थीनीने सर्वांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg