कणकवली(प्रतिनिधी)- डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिकसाठी युरेकाच्या 11 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. चार सुवर्ण, चार रजत, तीन ब्रांझ पदकांची लयलूट या विद्यार्थ्यांनी केली आहे. युरेकाच्या योगेश विवेकानंद जोशी (नववी), आरोही मनोज मेस्त्री (सहावी), रुद्र रामचंद्र पिकूळकर (सहावी), स्पृहा तुषार शिनखेडे (सहावी) हे बालवैज्ञानिक सुवर्णपदकाचे मानकरी ठरले तर योगी मेघनाथ लेले (सहावी), चिदानंद चंद्रशेखर रेडकर (सहावी), काव्या मुक्तानंद गौंडळकर (नववी), कीर्ती सुबोध येरुनकर (सहावी) यांना रजत पदक, इशान मयूर नागवेकर (नववी) प्रज्योत दिलीप कदम (सहावी) व सोहन शिवकुमार सूर्यवंशी कास्यपदकाचे मानकरी ठरले. राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेची डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक ही एक युनिक स्पर्धा गेली 44 वर्षे लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प व मुलाखत या चार टप्प्यात राबविण्यात येते. 2024 -25 या शैक्षणिक वर्षात देशभरातून 88803 विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी सहभागी झाले होते. 7.5% विद्यार्थी लेखी परीक्षेतून मेरीट नुसार 6674 विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली. देशभरात आठ केंद्रावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली होती या प्रात्यक्षिक परीक्षेतून दहा टक्के म्हणजेच 668 विद्यार्थ्यांची प्रकल्प व मुलाखत या टप्प्यासाठी निवड करण्यात आली. यातून दहा टक्के विद्यार्थी सुवर्णपदक व शिष्यवृत्ती, 50% रजत पदक व शिष्यवृत्ती व उर्वरित कास्य पदक व शिष्यवृत्ती चे मानकरी ठरले.
या सर्व बालवैज्ञानिकांना शास्त्रज्ञ डॉ. प्रियदर्शनी सावंत, डॉ. चिन्मय गवाणकर, एमकेसीएलचे विवेक सावंत यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे गौरविण्यात आले. तसेच बारामती येथे दोन दिवसीय शिबिरासाठी हे बालवैज्ञानिक सहभागी होणार आहेत. योगेश जोशी या नववीतील सावंतवाडीच्या विद्यार्थ्याने ए आय आधारित आंबा बागायती कृषी क्षेत्रात नवीन क्रांती या विषयावर प्रकल्पाचे सादरीकरण केले. आरोही मेस्त्री या सहावीतील कणकवली च्या बालवैज्ञानिकाने शाश्वत लँडस्केपिंग या विषया अंतर्गत शहरातील देवराई गोपुरी आश्रम या ठिकाणी कशा पद्धतीने उभारता येईल व कणकवलीच्या सौंदर्यात कशी भर पडेल हे तिने आपल्या प्रकल्पात सादर केले. रुद्र पिकुळकर या सहावीतील कडावलच्या विद्यार्थ्यांने प्लास्टिक मुक्त भविष्यासाठी शाश्वत लँडस्केपिंग हा प्रकल्प सादर केला . स्पृहा शिनखेडे या नागपूरच्या सहावीतील विद्यार्थिनींने इमारतीच्या छतावर स्क्रॅप मधील वस्तूंचा पुनर्वापर करून रोमॅटिक गार्डन कसे बनवू शकतो हा उत्कृष्ट प्रकल्प सादर केला. काव्या गौंडळकर या कणकवलीच्या नववीतील विद्यार्थिनींने सिंधुदुर्गातील ज्वलंत प्रश्न मानव हत्ती संघर्षावर भाष्य करीत AI आधारित उपाययोजना सुचवल्या या समस्येवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कशाप्रकारे मात करता येऊ शकते हे तिने आपल्या प्रकल्पात मांडले. योगी लेले या सहावीतील सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांने ऐतिहासिक माठयांचे शाश्वत लँडस्केपिंग या प्रकल्पाद्वारे माठेवाडीतील 18 माट्यांचे सर्वेक्षण करीत अतिक्रमण, कचर्याचे साम्राज्य, जंगल वाढ या समस्येने ग्रासलेल्या व काळाच्या पडद्याआड गेलेल्या या माठ्यांना कशाप्रकारे पुन र्जीवन देता येईल व याचा सावंतवाडीच्या ऐतिहासिक वारसा कसा जोपासला जाईल त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार संधी हे त्यांने प्रकल्पातून सादर केले. चिदानंद रेडकर या सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांने सार्वजनिक स्वच्छतागृहांचे शाश्वत लँडस्केपिंग हा उत्कृष्ट प्रकल्प सादर केला. दिलीप कदम या देवगडच्या विद्यार्थ्यांने शाळेतील वर्गामध्ये टेरेरियम चा वापर करून शाश्वत लँडस्केपिंग द्वारे वर्गाचे सुशोभीकरण करून शिक्षण आनंदमय व आल्हाददायी कसे होईल हे प्रकल्पाद्वारे सादर केले. इशान नागवेकर या नववीतील कणकवलीच्या विद्यार्थ्यांने सामान्य नागरिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता चलीत हापूस आंबा ऑथेंटीकेशन हा प्रकल्प सादर केला. सोहन सूर्यवंशी या सहावीच्या विद्यार्थ्यांने कचर्याची योग्य विल्हेवाट, पुनर्वापर करून शाळेच्या आवारात शाश्वत लैंडस्कॅपिंग हा प्रकल्प सादर केला. या सर्व बालवैज्ञानिकांना चारही टप्प्यांसाठी युरेकाच्या सौ सुषमा केणी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रात्यक्षिक परीक्षेकरिता सौ शितल वाळके यांचेही मार्गदर्शन लाभले. या बाल वैज्ञानिकांच्या यशात त्यांचे पालक तसेच जिल्ह्यातील तज्ञ मंडळी यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. युरेकाच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील नऊ नागपुरातील दोन बालवैज्ञानिकांनी पदकांची लयलूट करून सिंधुदुर्गचे नाव अधोरेखित केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.