loader
Breaking News
Breaking News
Foto

56 टक्के पगारावर एसटी कर्मचारी संघटनांनी आवाज उठवावा - वैभव नाईक ---

कणकवली (प्रतिनिधी)- एसटी कर्मचार्‍यांना केवळ 56 टक्के पगार देण्यात आला आहे. महायुती सरकारने कष्टकरी कर्मचार्‍यांची ही कुचेष्टा केली आहे. एसटीच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे. यावर एसटी कर्मचारी संघटनांनी आवाज उठविला पाहिजे. कामगार संघटनांमध्ये राजकीय परिवर्तन घडविण्याची ताकद आहे. आपल्या न्याय हक्कासाठी प्रसंगी झगडावे लागेल. त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. शिवसेना एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचार्‍यांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा एसटी कामगार सेनेला वाढता पाठींबा मिळत असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कणकवली एसटी आगार येथे शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा फलक लावण्यात आला असून या फलकाचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तर कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते, पदाधिकार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. एसटी कामगार सेनेच्या फलकाद्वारे आता सभासदांना वेगवेगळ्या सूचना व कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. याप्रसंगी सतीश सावंत म्हणाले, एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक उत्तम प्रकारे संघटना वाढविण्याचे काम करीत आहेत. एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत. त्यामुळे कामगार सेना फोफावत आहे. आम्ही देखील कामगार सेनेच्या ठामपणे पाठीशी राहणार आहोत. एसटी कमर्चार्‍यांना आपल्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे असे सांगितले. याप्रसंगी शिवसेना एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, कणकवली युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, धीरज मेस्त्री, कामगार सेना सिंधुदुर्ग विभागीय सचिव आबा धुरी, सिंधुदुर्ग विभागीय कार्याध्यक्ष सुनिल तारी, सिंधुदुर्ग विभागीय खजिनदार नंदकिशोर तळाशिलकर, कणकवली आगार अध्यक्ष संतोष तेली, सचिव बालाजी गुट्टे, मिलिंद आईर इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगार सचिव बालाजी गुट्टे यांनी यापुढेही शिवसेना संघटना जोमाने वाढवू असे सांगून सर्वांचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg