loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा पोलीस ठाणे, जिजाऊ फाउंडेशन व टीडब्ल्यूजे फाउंडेशन यांचे सहकार्याने मनोरुग्ण नातेवाईकांच्या ताब्यात ---

लांजा - (संजय साळवी) - लांजा तालुक्यातील काही फिरते मनोरुग्ण यांना दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी येथे मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते. त्या मनोरुग्णांची प्रकृती सुधारल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेवून ताब्यात देण्यात आले. माणुसकीच्या प्रचितीतून लांजा पोलीस ठाणे, जिजाऊ फाउंडेशन व टीडब्ल्यूजे फाउंडेशन यांच्या सहकार्याने अखेर ते आपल्या घरी कुटुंबीयांमध्ये पोहोचले. सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रस्ते, पर्यटनस्थळी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, शाळा, कॉलेज परिसर आदी ठिकाणी आढळणार्‍या मनोरुग्णांवर उपचाराच्यादृष्टीने लांजा पोलीस ठाण्याच्यावतीने कार्यवाही करण्यात आली होती. यावेळी लांजा तालुक्यातील चार व्यक्तींना उपचारासाठी रत्नागिरी येथे दि. 29 जानेवारी रोजी पाठविण्यात आले होते. याकामी लांजा पोलीस ठाण्याला नागपूर येथील टीडब्ल्यूजे फाऊंडेशन व जिजाऊ फाउंडेशन यांची मोलाची मदत झाली. या रुग्णांना लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनानुसार लांजा पोलीस ठाण्यात नोंद करून पुढे रत्नागिरी येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. दोन महिन्याच्या उपचारानंतर मनोरुग्णांच्या प्रकृती सुधारणा झाल्याने लांजा पोलीस ठाण्यात त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, पोलीस हेड. कॉन्स्टे. सचिन भुजबळराव आणि संबधित नातेवाईक उपस्थित होते. दरम्यान, लांजा पोलीस ठाणे, जिजाऊ फाउंडेशन व टीडब्ल्यूजे फाउंडेशन यांच्यावतीने माणुसकीची प्रचिती देणार्‍या कार्याचे तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg