loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील 'या' महिलांना 1500 ऐवजी मिळणार केवळ 500 रूपये

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाची आता स्क्रुटिनी सुरू झाली आहे त्यामुळे लाभार्थ्यांच्या यादीमधून अनेकींची काटछाट सुरू झाली आहे. आता अन्य योजनांचा लाभ घेणार्‍या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मधून मिळणारे पैसे कमी केले जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सरकारी पडताळणी नंतर आता लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये कपात होणार आहे. सरकारच्या अंदाजानुसार यामध्ये 10-15 लाभ महिला लाभार्थी कमी होऊ शकतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मीडीया रिपोर्ट्सनुसार, लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये 8 लाखापर्यंत महिलांच्या मानधनामध्ये कपात झाली आहे. या महिला लाडकी बहिण योजना सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी चा देखील लाभ घेत होते. त्यामुळे या 8 लाख महिलांना आता 1500 ऐवजी केवळ 500 रूपये मिळणार आहेत. या महिला आधीच शेतकरी महासन्मान निधी मधून 1 हजार रूपये मिळवत आहेत.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मध्ये 5 मानदंडांवरून महिला लाभार्थी आहे की नाही? हे ठरवत आहेत. महिलांचे वय 18-65 वर्ष आवश्यक आहे. ती महाराष्ट्राची नागरीक असावी. कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख असावं. घरात चार चाकी असल्यास किंवा घरात कोणी सरकारी कर्मचारी असल्यास ती पात्र नसेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg