loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील प्रसिद्ध परकार हॉस्पीटलला डीएनबी जनरल मेडिसिन या अभ्यासक्रमाची मान्यता

रत्नागिरी : पदव्युत्तर अभ्यासक्रम डीएनबी (DNB) जेनरल मेडिसिन या अभ्यासक्रमासाठी परकार हॉस्पिटल रत्नागिरीला नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (NBEMS) ची मान्यता मिळाली आहे. कोकणातील हे पहिले हॉस्पिटल आहे, ज्याला ही मान्यता मिळाली. ही कोकणसाठी मानाची गोष्ट आहे. परकार हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या डॉ. कल्पना मेहता आणि डॉ. शिरीष शेणई यांना मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (NBEMS) ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार ची एक स्वायत संस्था आहे. १९७५ ला नवी दिल्ली येथे त्याची स्थापना झाली. या अंतर्गत एमबीबीएस नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम डीएनबी फेलोशिप, डिप्लोमा, डेंटल संदर्भातले आभ्यासक्रम घेतले जातात. या अभ्यासक्रमासाठी वि‌द्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय गुणवता यादीतून होते. कोकणातील हे पहिले हॉस्पिटल आहे ज्याला ही मान्यता मिळाली. प्रत्येक वर्षी २ विद्यार्थ्यांची निवड पदव्युतर अभ्यासक्रमासाठी होणार आहे. हॉस्पिटलच्यादृष्टीने वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रातले हे पुढचे पाऊल आहे. ज्याने रुग्णांना पण फायदा होईल आणि परकार हॉस्पिटलच्या गुणवतत्तेमध्येही भर पडणार आहे. हा हॉस्पिटलच्या वाटचालीचा पुढचा टप्पा असेल.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg