रत्नागिरीपासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या आरेवारे पर्यटन ठिकाणी गेल्यानंतर तेथील सौंदर्य पाहून पर्यटकांना भुरळ पडते. आरे पूलाच्या पूर्वेला विस्तीर्ण खाडी तर सकाळच्या प्रहरी मनाला आनंददायी असते. पश्चिमेला उसळणार्या समुद्राच्या लाटा पाहून पर्यटक फार भारावून जातात. वारे आणि नेवरे समुद्रकिनारा स्वच्छ किनारा म्हणून ओळखला जातो. तसाच तो विस्तीर्ण असा आहे. गोव्यापेक्षा आरेवारे, गणपतीपुळे या पर्यटनस्थळांना पर्यटक प्राधान्याने भेटी देत आहेत. आरेवारेचे सौंदर्य तर वेडावून टाकते.
या परिसरात माफक दरात निवास व्यवस्था आहे. ४०० रुपयापासून १००० रुपयापर्यंत इथे निवास व्यवस्था आहे. ढोकमळे येथे ३ ते ४ ठिकाणी निवास करता येतो. अगदीच महागडे आणि चांगले निवास ठिकाण हवे असेल तर सीसन बीच हॉटेल येथे राहण्याची व्यवस्था आहे. तेथे सुरक्षित असे ठिकाणी असून उंचावरुन समुद्र पाहता येतो, जणू समुद्राच्या पुढ्यातच आपण आहोत, असा भास होतो.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पर्यटकांची संख्या वाढली आहे, कारण या परिसरात सध्या वातावरण थंड आहे. रात्रीच्या वेळी समुद्रावरुन येणार्या मतलई वार्यांनी इथले वातावरण थंड ठेवले आहे. गणपतीपुळे येथे समुद्रात पर्यटन करता येते तर नेवरे येथे समुद्रात किंवा खाडी भागात बोटीतून निवास व्यवस्थेची सोय आहे. आरे येथे बैलगाडीत बसण्याचा आनंदही लुटता येतो. जास्त खोलगट नसलेला किनारा हे इथले वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पर्यटक प्राधान्याने आरेवारे, गणपतीपुळे या ठिकाणांची पर्यटनासाठी निवड करताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून शनिवार व रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. गणपती बाप्पाचे दर्शन आणि पर्यटन हा योग येथे साधला जातो. (रत्नागिरी टाइम्स)
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.