वरवेली (गणेश किर्वे) : क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्रित करणार्या प्रमोद गांधी तुम्ही आमदार व्हावं, विधानसभेत जावं, या गुहागरतील प्रलंबित जे विषय आहेत ते विधानसभेमध्ये ठामपणे आपण मांडावेत... याचसाठी मी राज साहेबांच्या शुभेच्छा मी घेऊन येथे आलो असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले. मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आयोजित एक समाज एक संघ मनसे समता चषक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी वैभव खेडेकर उपस्थित होते यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, गेली चार दिवस यूटयूबच्या माध्यमातून मी हे सामने पाहत आहे, अतिशय रंगतदार सामने झाले आहेत, गुहागर तालुक्या सारख्या ग्रामीण भागामध्ये अशा मोठ्या स्पर्धा होऊ शकतात, एक रोमांच व उत्साह या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला, अशा पद्धतीच्या क्रिकेटचे सामने या ठिकाणी होऊ शकतात. हे प्रमोद गांधी व गुहागर तालुकावासीयांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिले, क्रिकेट एक पर्वणी असते, अनेक संघ असतात. विशेष कौतुक करावं ते म्हणजे समाजाची संघटना असते समाजाचे बंधुत्व असते या समाजाच्या संघाच्या माध्यमातून या स्पर्धा घ्याव्यात ही अभिनव संकल्पना प्रमोद गांधी यांनी गुहागर मध्ये प्रथम राबवली, अतिशय उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. समाजाचे मुंबईमध्ये असलेले सर्व सहकारी असतील, गाव जिल्ह्यामध्ये राहणारे असतील, परिसरामध्ये राहणारे असतील, आपला समाज पुढे जावा आपला समाज जिंकावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. असे अनेक सामने आपल्याला पाहायला मिळाले. क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. पुढच्या वेळी अधिक प्रयत्न करायचा असतो, पुढे आपल्याला जिंकायचं आहे.. हे लक्षात असायला हवे.. आता आपल्याला कोणाला छत्र्या द्यायच्या नाहीत.. आता आपल्याच छत्रीमध्ये सर्वांना घ्यायच आहे.. हे प्रमोद गांधी यांनी लक्षात घ्यावं.
आमदार भास्कर जाधव यांचे नाव न घेता वैभव खेडेकर म्हणाले की, काही लोक आले व म्हणाले.. मनसेची छत्री आमच्या हातामध्ये आहे.. त्यामुळे मला आता चिंता नाही.. परंतु आम्हाला प्रमोदजी यांच्यावरती छत्री धरायची आहे आणि प्रमोदजींना आम्हाला आमदार बनवायचा आहे.. यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.. आम्ही अपयशातून भरपूर शिकलो आहोत.. आम्ही संघर्ष करणारी सगळी मंडळी आहोत.. जोपर्यंत आम्ही प्रमोद गांधी यांना आमदार करत नाही तोपर्यंत अविरतपणे आमचा लढा सुरू राहील आता प्रत्येकाला वाटत असेल की मनसेचा आम्हाला सहभाग हवा आहे, काही लोक म्हणाले की, मनसेने छत्री आम्हाला दिली आहे त्यामुळे मला काही चिंता नाही परंतु तो राजकीय भाग मी बोलणार नाही परंतु प्रमोद जी आता येथून पुढे प्रत्येक कार्यकर्त्यावरती छत्री धरा ...संघटन मजबूत करा भविष्यात आपल्याला या मतदारसंघात प्रमोदजींच्या माध्यमातून मनसेचा आमदार या ठिकाणी निवडून गेलेला आम्हाला पाहायचा आहे, यासाठी आपण कटिबद्ध होऊया.. सुंदर स्पर्धा या ठिकाणी आपण घेतल्या आहात ..सर्व समाज अध्यक्षांना व समाज बांधवांना शुभेच्छा देत आहोत.. ही स्पर्धा प्रत्येक वर्षी घेण्यात यावी. क्रीडा, सामाजिक, आध्यात्मिक सगळ्या बाबींमध्ये आपण कार्यक्षम असायला पाहिजे, त्यासाठी तुमची ही सर्व टीम उत्तमपणे काम करत आहे, एक वेगळा पायंडा गुहागरमध्ये पाडला आहे, यासाठी आपल्याला विधानसभेमध्ये जावे लागणार आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.