loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे परिसरातील आंबा बागांचे गवा रेड्यांकडून नुकसान

देवळे (प्रकाश चाळके) : संगमेश्वर तालुक्यातील देवळे परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या आंबा बागांचे गवा रेड्यांकडून अतोनात नुकसान केले जात असून यावर वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची मागणी आहे. सध्या देवळे चाफवली गावातील आंब्याच्या बागातून गवारेड्यांचे कळपच्या कळप येत असून हाता तोंडाशी आलेल्या आंबा पिकांचे भयानक नुकसान करत असून यावर कोणती उपाययोजना करता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. हे गव्यारेड्यांचे कळप आंबा बागेत घुसतात आणि जिथपर्यंत मान पोहोचते तिथपर्यंतचा आंबा ओढून खातात किंवा फांद्यांना घासून, फांदी हलवतात व मोडतातही त्याने आंबा खाली पडला की तो खातात, बाकीचा आंबा तसाच सोडून जातात. यामुळे आंबा बागातदारांचे फार मोठे नुकसान होत असून यावर पर्यायच मिळत नसल्याने व ते हाकलूनही जात नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काजू बागायतीबाबतही गवे रेडे असेच फार मोठे नुकसान करत असून छोटी मोठी काजूची झाडे शिंगात अडकवून उपटून टाकतात त्यामुळे आजया भागातील शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान होत आहे. देवळे गावातील सलीम खतीब, नाझीम खतीब, चाफवली येथील लक्ष्मण चाळके, प्रकाश चाळके यांच्या आंब्याच्या बागांचे गवारेड्यांनी फार मोठे नुकसान केले आहे. हे गवे फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही बागांतून फिरू लागले आहेत. त्यामुळे यांचा बंदोबस्त कसा करावा? या विवंचनेत या भागातील शेतकरी सापडले आहेत.

टाइम्स स्पेशल

याबाबत वनविभागाकडे तक्रार केल्यास त्याला लागणारे कागदपत्र गोळा करण्यातच फार वेळ लागतो. कृषी विभाग, तलाठी कार्यालय, घोषणापत्र, सातबारा, आठ अ, भूमी अभिलेखचा नकाशा, अशा अनेक गोष्टींचा पाठपुरावा करताना व सह्या घेताना पंच याद्या घालताना, शेतकरी हैराण होतो. त्यामुळे तक्रार ही करायला शेतकरी पुढे येते नाहीत. माकडांचाही असाच त्रास होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी, गावचे पोलीस पाटील, सरपंच, यांच्या सहीचा पंचनामा हाच ग्राह्य धरून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg