loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर यांच्या उपस्थितीत मंडणगड तालुका शिवसेना संघटकपदी जितेंद्र दवंडे यांची एकमताने निवड ---

दापोली (प्रतिनिधी)- दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर यांनी भगवा झंझावात निर्माण केला आहे. मागील काही दिवसांपासून कीर्तीकर यांनी दापोली खेड तालुक्यातील पंचायत समिती गण निहाय सभांवर भर देत हे दोन्ही तालुक्यातील गावे अक्षरश: पिंजून काढली आहेत. ठिक ठिकाणच्या गावांमध्ये त्यांच्या सभांना मिळणारा शिवसैनिकांच्या उदंड आणि उस्फूर्त उपस्थितीचा प्रतिसाद हे त्यांच्या दौ-याचे खरे यश म्हणावे लागेल. अशाच प्रकारे सोमवारी १४ एप्रिल रोजी दापोली विधानसभा मतदार संघातील मंडणगड तालुक्याचा दौरा त्यांनी केला. यावेळी मंडणगड तालुका शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची कार्यकारणी तसेच मुंबई वासीय पदाधिकारी त्याचप्रमाणे शिवसैनिक महिला शिवसैनिक, युवासेना आणि शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड शहरातील गोवळे कॉम्ल्पेक्स येथे पार पडलेल्या सभेत शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मंडणगड तालुका कार्यकारणीने एकमताने जितेंद्र दवंडे यांची तालुका संघटकपदी निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात जितेंद्र दवंडे यांच्या निवडीच्या घोषणेचे स्वागत केले. मंडणगड तालुका शिवसेना संघटक म्हणून मंडणगड तालुक्यातील बोरखत गावचे सुपुत्र आणि उमरोली विभागाचे विभाग प्रमुख जितेंद्र दवंडे यांची शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर यांच्या उपस्थितीत मंडणगड तालुका कार्यकारणीकडून तालुका संघटक म्हणून घोषणा करण्यात आली. यावेळी दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख मुजीब रुमाणे, मंडणगड शिवसेना संपर्क प्रमुख महेश गणवे, मंडणगड तालुका मुंबई संघटक विनायक चोरगे, सहसंघटक रविंद्र धनावडे, उप तालुका प्रमुख रघुनाथ पोस्टूरे, उप तालुका प्रमुख संदिप वाघे, उप तालुका प्रमुख मंगेश दळवी, तालुका सचिव सुधिर पागार, दापोली तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, युवासेना उप जिल्हा अधिकारी गणेश बिल्लार, युवासेना मंडणगड तालुका अधिकारी विश्वनाथ टक्के, मंडणगड तालुका आयटी सेल प्रमुख प्रकाश महाडिक, उप तालुका अधिकारी उमेश घागरुम, विभाग प्रमुख जितेंद्र दवंडे, विभाग प्रमुख सतिष खोपकर, विभाग अधिकारी सिध्दार्थ शिंदे, उप विभाग प्रमुख कलंदर मुगरुसकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg