खेड (दिवाकर प्रभु) : जत्रोत्सवनिमित्त मानाची पालखी खवटी - श्रीदेव केदारनाथ , तळे - श्री देवी वाघजाई कलमजाई, आंबये - श्रीदेवी भैरी कोटेश्वरी, ऐनवरे - श्री देव वाघोबा या देवांच्या ग्रामदेवता आई सोमजाईदेवीच्या भेटीला येणार आहेत. संपूर्ण गावामध्ये लाटेची मिरवणूक शुक्रवार दिनांक १८ एप्रिल संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत निघेल .आई सोमजाईदेवीचा भाऊ खवटी गावचा ग्रामदैवत देव केदारनाथ पालखी आगमन झाल्यानंतर रात्री ९ ते १० दरम्यान लाट सारवरती चढवण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर अन्य गावच्या ग्रामदैवतांच्या पालख्यांचे आगमन होईल .
आई सोमजाई मंदिराच्या सभामंडपाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी शिवसेना नेते, माजी मंत्री रामदासभाई कदम आणि गृह व महसूल राज्यमंत्री ना. योगेशदादा रामदाभाई कदम यांच्या हस्ते होणार आहे .या सोहळ्यावेळी शिवसेना उपनेते, माजी आमदार संजयराव कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार दिनांक १८ एप्रिल करमणुकीचा कार्यक्रम छत्रपती कलामंच, शिवाजीनगर, अंबरनाथ मुंबई यांच्या " रंगात रंगला महाराष्ट्र " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता चौकपूजन व लाट फिरवणे तसेच आलेल्या गावांचे ग्रामदेवता पालख्यांचा निरोप समारंभ होईल. खवटी गावचा ग्रामदैवत श्री केदारनाथ व दिवाणखवटी गावची ग्रामदैवत आई सोमजाईदेवी या दोन भावा - बहिणीची भेट होऊन जत्रोत्सवाची सांगता होईल.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.