loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता आठ पदरी करण्याचा MSRDC चा प्रस्ताव

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रवास आता वेगवान होणार आहे. सध्या मिसिंग लिंकचे काम सुरू असताना एमएसआरडीसीने हा रस्ता सहा ऐवजी आठ पदरी करण्याचा प्रस्ताव केला आहे. सुमारे 70 किमीच्या रस्त्यासाठी 100 हेक्टर जागा आवश्यक आहे. त्यासाठी राज्यसरकार कडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आठ पदरी रस्त्याला मंजुरी मिळाल्यास एक्सप्रेस वे ची क्षमता वाढणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वर्दळ पाहता हा रस्ता वाढवण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. हा एकूण 94 किमी लांबीचा रस्ता आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागामध्ये 13.3 किमी चा पर्यायी रस्ता आहे. जो मिसिंग लिंक प्रोजेक्ट आहे. सध्या या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये 1.67 किमीचा 8.92 किमीचा बोगदा आहे. या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे.

टाइम्स स्पेशल

खालापूर टोल ते खोपोली एक्झिट हा आठ पदरी आहे. त्याच्या पुढे आता उर्से टोल नाकापासून आठ पदरी रस्ता करण्याचे काम एमएसआरडीसी ने प्रस्तावित केले आहे. संपूर्ण एक्सप्रेस वे आठ पदरी झाल्यास त्यावरील प्रवास विनाअडथळा होणार आहे. सध्या हा प्रस्ताव सरकार दरबारी असल्याची माहिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg