loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी येथील युवकाचा झाडावरून पडून मृत्यू ---

दोडामार्ग(प्रतिनिधी)- साटेली भेडशी सुतारवाडी येथील युवक नागेश लाडू मयेकर वय वर्षे ४० हा मंगळवारी सकाळी घोटगे येथे एका घराच्या बाजूला असलेले झाड तोडण्यासाठी वुड कटर घेऊन गेला होता. यावेळी आणखी काही जण सोबत होते. झाडाची एक फांदी कापत असताना अचानक पाय सटक सटकला आणि तो खाली पडला. यावेळी कटर चालू राहिला यामुळे एका पायाला गंभीर जखम होऊन जादा रक्तस्राव होऊ लागल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करिता दाखल केले. पण अधिक उपचारासाठी वेळीच रुग्णवाहिका चालक उपलब्ध झाला नाही त्यामुळे उपचाराअभावी साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे त्याचा मृत्यू झाला. असे शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी म्हटले असुन करून या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली भेडशी सुतारवाडी येथील युवक नागेश लाडू मयेकर हा सर्वांशी मिळून मिसळून राहात असे तो गोवा येथे एका कंपनीत देखील कामाला जात असे. मंगळवारी सकाळी तो घरातून घोटगे गावात गेला होता काही प्रमाणात झाड तोडून झाले होते. तर काही शिल्लक होते. एका शिडीवर उभा राहून झाड कटर घेऊन कापत असताना अचानक पाय घसरून तो खाली पडला यावेळी कटर चालू राहिला आणि पायावर कटर वार होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याच अवस्थेत त्याला तातडीने साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे दाखल केले. येथील डॉक्टर, आरोग्य सेविका उपचार केले परंतु गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला तातडीने गोवा येथे हलविणे गरजेचे होते. पण याच दरम्यान रुग्णवाहिका व चालक उपलब्ध झाला नाही या गैरसोयीमुळे नागेश मयेकर याचा आरोग्य केंद्र येथे मृत्यू झाला. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृत्यू झाला असे शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी म्हटले आहे. साटेली भेडशी येथील नागेश मयेकर याचा झाडावरून पडून मृत्यू झाला ही वार्ता समजताच साटेली गावातील परिसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिल्यावर दोडामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक, तसेच कोनाळकट्टा पोलीस दूर क्षेत्र पोलीस कर्मचारी तसेच पोलीस पाटील, आरोग्य केंद्र येथे दाखल होऊन पंचनामा केला काही जणांचे जबाब घेतले. नागेश मयेकर याने काही वर्षे पञकार म्हणून काम केले होते. साटेली भेडशी गावातील सर्वांशी त्याची जिव्हाळ्याची मैञी होती. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, इतर परिवार आहे. त्याच्या अकाली अपघाती निधनामुळे साटेली भेडशी गावात शोककळा पसरली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg