loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी आम. परशुराम उपरकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव---

कणकवली(प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आम. परशुराम उपरकर यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अभ्यास नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे परशुराम उपरकर यांना वाढदिवसानिमित्त राजकीय पक्षातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, नातेवाईकांनी सकाळपासूनच शुभेच्छा दिल्या. माजी आम. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार पासून उपरकर यांची उत्कट भावनांची प्रकट मुलाखत दूरदर्शन निवेदिका स्मिता गव्हाणकर त्याचप्रमाणे मुक्त पत्रकार ऋषी देसाई यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचे अंतरंग उलघडणारे विविध प्रश्न मुलाखतकाराने उपस्थित केले या प्रश्नांना उत्तरे देताना श्री उपरकर यांनी आपली राजकीय वाटचाल स्पष्ट केली. अत्यंत परखड आणि तितक्याच विनोदी शैलीने उत्तरे देताना आपले राजकीय जीवन उपस्थितांसमोर मांडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुलाखतीनंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर केक कापण्यात आला. यावेळी पत्नी प्रणाली, मुलगा प्रणव, मुलगी पूर्वजा ,भाऊ हेमंत यांच्यासह कुटुंबातील मंडळी त्याचप्रमाणे मित्रमंडळी हितचिंतक उपस्थित होते. तत्पूर्वी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत ,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,प्रसाद गावडे, शैलेश भोगले, विनोद सांडव, आशिष सुभेदार, लक्ष्मण तारी, चंद्रशेखर उपरकर, संतोष सावंत, समीर परब, गजानन उपरकर यांच्यासह जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg