loader
Breaking News
Breaking News
Foto

नदीवर हातपाय धुवायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

पाचल (राजापूर) - परीक्षेचा पेपर देऊन घरी परतताना गावातल्या नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीच्या पात्रातील दगडावर पाय घसरून बुडून मृत्यू ओढवला. ही घटना गुरूवारी राजापूर तालुक्यातील रायपाटण या गावी घडली. पोलीसांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी जिजामाता विद्यामंदिर - रायपाटण या शाळेतील इयत्ता नववीत शिकत असलेला कुमार गंधार अमित पळसुलेदेसाई (वय वर्ष 15, राहणार रायपाटण बागवाडी) हा विद्यार्थी परीक्षेचा पेपर संपल्यानंतर गावच्या मांडावर खेळायला गेला. खेळून झाल्यावर मित्रांसोबत जवळच असलेल्या नदीवर हातपाय धुण्यासाठी गेला असता नदीच्या पात्रातील दगडावर पाय घसरून पाण्यात बुडाला. ही बातमी ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेऊन तरुणाला पाण्यातून बाहेर काढले व जवळ असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg