loader
Breaking News
Breaking News
Foto

भरदुपारी मुसळधार पावसाने खेडला झोडपले

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) : खेड तालुक्यात आज उन्हाच्या झळानंतर दुपारी दीडच्या सुमारास अचानक वातावरणात आमूलाग्र बदल झाला. ढगांनी आभाळ भरून आलं आणि विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट यानंतर जोरदार वार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही तासांतच परिसरात पाणीच पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाने काही वेळानंतर विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा तापदायक उन्हाने दर्शन दिलं. या विचित्र हवामानामुळे नागरिक हैराण झाले असून, पावसाळा खरंच सुरु झालाय की अजून नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये चर्चेला आला आहे. पारंपरिक अंदाजानुसार पावसाची खरी सुरुवात ७ जूनला होते, तर ८ जूनला मृग नक्षत्र सुरु होत आहे. हे नक्षत्र बळीराजासाठी शेतीच्या कामाची गती वाढविण्याचे संकेत असते. मात्र यंदा मे महिन्यापासूनच झालेला मुसळधार पाऊस जुलै महिन्याचा आभास निर्माण करत आहे. ओढे, नाले, छोटे प्रवाह आणि नदीपात्र भरून वाहू लागली आहेत. पावसामुळे अनेक शेतकर्‍यांची पेरणीची तयारी उधळली असून, पावसाळी शेती ’रामभरोसे’ झाली आहे. हवामान विभाग आणि कृषी विभागाकडून सततच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. यावर्षीची शेती अनिश्चिततेच्या सावटाखाली असल्याची शंका शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg