loader
Breaking News
Breaking News
Foto

राज ठाकरेंचे उध्दव यांना 12 कॉल्स! शिलेदारानं शब्द न् शब्द सांगितला

मुंबई: मागील दीड महिन्यांपासून ठाकरे बंधू यांच्या संभाव्य मनोमिलनाच्या चर्चा जोरात सुरु आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एप्रिलच्या अखेरीस याबद्दल सकारात्मक विधानं केली. त्यानंतर मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला. यासंदर्भात बोलताना मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार संदीप देशपांडेंनी याआधीचे कटू अनुभव सांगितले. 2017 मध्ये युती होता होता कशी फिस्कटली याबद्दल देशपांडे पहिल्यांदाच अगदी सविस्तर बोलले. आमच्या गाठिशी कटू अनुभव आहेत, ते सहजासहजी कसे विसरणार, असा सवाल त्यांनी विचारला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

2014 असेल किंवा 2017 असेल, विशेषत: 2017 मध्ये आम्हाला वाटतं होतं की युती करायला हवी. तेव्हा बाळा नांदगावकरांकडे राज ठाकरेंनी निरोप दिला आणि त्यांना मातोश्रीवर जाण्यास सांगितलं. राज ठाकरेंचा निरोप घेऊन नांदगावकर मातोश्रीवर गेले. दुर्दैवानं त्यांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही. पण त्यांना खाली सुभाष देसाई भेटले. राज साहेबांचा निरोप नांदगावकर यांनी देसाईंकडे दिला. निरोप उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवा, असं नांदगावकर यांना देसाईंना सांगितलं,’ असा घटनाक्रम देशपांडेंनी सांगितला. ते ‘मुंबई तक’वर एका कार्यक्रमात बोलत होते.

टाईम्स स्पेशल

सुभाष देसाईंनी राज ठाकरेंचा निरोप उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवला. आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत होतो. त्यानंतर राज ठाकरेंनी मातोश्री बंगल्यावर 12 ते 15 फोन केले आणि मी हे अतिशय जबाबदारीनं सांगतोय. उद्धव ठाकरेंच्या मोबाईलवर कॉल केले. मिलिंद नार्वेकर यांनादेखील कॉल केले. मातोश्रीवर फोन केल्यावर उद्धव ठाकरे बैठकीत असल्याचं सांगितलं जायचं. ते कॉल करतील, असंही सांगितलं गेलं. उद्धव ठाकरेंच्या मोबाईलवर कॉल केले. त्यांनी उचलले नाहीत. त्यानंतर तो विषय आमच्यासाठी संपला,’ अशा शब्दांत देशपांडेंनी त्यांचा कटू अनुभव कथन केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg