loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणी चाकरमान्यांचे झटक्यात बुकिंग होणार!

ठाणे : मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी शहरांमधून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. त्यात सध्याच्या घडीला ठाणे रेल्वे स्थानकात असलेल्या आरक्षण तिकीट खिडक्यांच्या संख्या गर्दीच्या काळात कमी पडत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याची दाखल घेत, गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु होणार आहेत. यामुळे गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे. गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय. नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लोखो कोकणवासिय ठाणे, मुंबई आणि उपनगरांत स्थायिक झाले आहेत. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात असू द्या गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच. गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र आरक्षण खिडक्यांची नगण्य संख्या आणि लांब रांग यामुळे कोकणवासीय मेटाकुटीला येतात.

टाईम्स स्पेशल

ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले 4 वर्ष लावून धरली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेने ही मागणी नरेश म्हस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लागला आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे 7 मे 2025 रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला. या पत्राची तातडीने दखल घेत 2 जून 2025 रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरु करत असल्याची माहिती दिली आहे. 20 जून 2025 ते 5 जुलै 2025 या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु राहणार आहेत. सध्या 4 आरक्षण खिडक्या कार्यरत असून 2 अतिरिक्त खिडक्या सुरु होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg