loader
Breaking News
Breaking News
Foto

वॉचमनच्या खोलीत सापडलेले मांस बोकडाचं

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील एका अपार्टमेंटच्या वॉचमनच्या खोलीत जप्त केलेले मांस गोवंशाचे नसून बोकडाचे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मांसाचे अन्य अवशेषही तपासणीसाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवार (ता.3) एका अपार्टमेंटमध्ये गोमांस सापडलेल्याच्या संशयावरून सकल हिंदू समाज आक्रमक झाला. पोलिसांनी मांस जप्त करत वॉचमन पती पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल केला होता. वॉचमनची चौकशी केल्यानंतर त्याने वस्तुस्थिती कथन केली. नासीर याने सिरोही जातीचा बोकड राजस्थान येथून आणला होता. हवामानातील बदलामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला उद्यमनगर येथील पशुचिकित्सालय येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथून घरी आणण्यात आले. परंतु मंगळवारी त्या बोकडाचा मृत्यू झाला. मृत्यू बोकडाची विल्हेवाट लावण्यासाठी मुल्ला याने घंटागाडीत देण्याचा प्रयत्न केला. परंतु मृतप्राणी घेत नसल्याचे पालिका कर्मचार्‍यांनी सांगितले. अखेर वॉचमनने याच्यासह त्याच्या सहकार्‍यांना मृत बोकड पुरण्यासाठी दिला. त्यासाठी एक टेम्पो आणण्यात आला. त्यानंतर मृत बोकड पुरण्याऐवजी तो कापला हा घटनाक्रम ऐकून पोलिसांनी याची खातरजमा केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg