loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये शिवसेनेचा जंबो पक्षप्रवेश सोहळा

खेड (दिलीप देवळेकर)- खेडमधील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आरिफ भाई मुल्लाजी यांचा अनेक कार्यकर्त्यासहित नामदार योगेशदादा कदम, शिवसेना नेते रामदासभाई कदम, शिवसेना उप नेते संजयराव कदम, अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे व उद्योगपती बशीर हजवानी, कलंदर शेखनाग, सिकंदर जसनाईक, उद्योजक शमसुदीन मुकादम, महेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रवेशात शिवसेना नेते रामदास भाई कदम व ना.योगेशदादा कदम यांनी अलसुरे, लोटे , धामणंद, कोडीवली, भोस्ते, नीलिक खोपी, लोटे या गुहागर मतदार संघातील माजी सरपंच व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. . माजी आमदार संजय कदम यांच्यासाठी गुहागर मतदार संघ मजबूत करण्यासाठी शिवसेना नेते रामदास भाई कदम व ना गृह राज्य मंत्री योगेश दादा कदम यांनी मजबूत पावले उचलली आहेत. दुबईचे उद्योजक खेडचे सुपुत्र बशीरभाई हजवानी व मूळचे दापोली हर्णेचे उद्योजक कलंदर भाई शेखनाक यांनी त्यांच्या प्रयत्नाने दापोली व गुहागर मतदार संघातील शेकडो मुस्लिम पदाधिकारी यांनी सेनेत प्रवेश केला. रामदास भाई यांनी नवीन रणनीती आखून आ भास्कर जाधव याचा गड काबीज करण्याचा जोरदार प्रयत्न आज पासून सुरू केल्याने एकच राजकीय वातावरण तापले आहे.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अल्प संख्याक जिल्हाप्रमुख सिंकदर जसनाईक, दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन, संघटक महेंद्र भोसले, महीला उप जिल्हा संघटिका सौ.सुप्रिया पवार, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, मंडणगड तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, गुहागर तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, खेड शहर प्रवक्ते सतिश उर्फ पप्पू चिकणे, युवासेना तालुकाप्रमुख मिलींद कांते, खेड शहरप्रमुख कुंदन सातपुते, खेड शहर संघटिका सौ.माधवी बुटाला, आनंद कोळेकर, युवासेना शहर प्रमुख सिध्देश खेडेकर, रोहन भोजने, राजु आंब्रे, पुष्पेन दिवटे तसेच सर्व शिवसेना, युवासेना, महीला आघाडी, युवती सेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg