loader
Breaking News
Breaking News
Foto

सिडको लॉटरी, नवी मुंबई परिसरात 22 हजार घरांसाठी सोडत, कोंकण विभागातील जनतेसाठी उपयुक्त ठरू शकेल

सिडको नवी मुंबई येथील घरांसाठी लवकरच सोडत काढत आहे. साधरण विद्यमान म्हणजेच जून महिन्याच्या अखेरीस ही सोडत निघेल. ज्यामध्ये साधारण 22,000 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. सिडको CIDCO) संचालकांची एक बैठक येत्या बुधवारी पार पडणार आहे. या बैठकीत या घरांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, आगोदरच्या गृहयोजनेत शिल्लख राहिलेल्या 16 हजार घरांचासुद्धा या वेळच्या सिडको लॉटरी मध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे घरांची संख्या अधिक असून, नागरिक त्यास कसा प्रतिसाद देतात याबाबत उत्सुकता आहे. हि सोडत कोंकण विभागातील जनतेसाठी उपयुक्त ठरू शकेल ,असे म्हटले जाते .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

म्हाडाप्रमाणेच सिडको ही देखील गृहनिर्माण संस्था आहे. अर्थात दोन्ही संस्थांमध्ये काहीसा भेद निश्चितच आहे. या दोन्ही संस्था सरकार द्वारे उभारलेल्या घरांची सोडत काढत असतात. सिडकोने या आधी 26,000 घरांसाठी सोडत काढली होती. मात्र, त्यास अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुरु असलेल्या जून महिन्याच्या अखेरपर्यंत विविध नोडमधील घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. या सोडतीमध्ये 22 हजार घरांचा समावेश असणार आहे. जवळपास दहा हजार ग्राहकांनी घराचा पहिला हप्ता भरला आहे. हे ग्राहक पहिल्या सोडतीमध्ये यशस्वी झाले होते. कोंकण विभागातील सामान्य नागरिक समाधानकारक प्रतिसाद देतील असे म्हटले जात आहे .

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg