loader
Breaking News
Breaking News
Foto

काँग्रेसचा राज्यभर मशाल मोर्चा! विधानसभेत ‘मतचोरी’ केल्याचा आरोप

विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही, असा दावाही काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस आज राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे. विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठे यश मिळाले व भाजपा युतीचे पानीपत झाले होते. विधानसभा निवडणुकीत युती 100 जागाही जिंकू शकणार नाही, अशी परिस्थिती असताना भाजपा युतीला प्रचंड बहुमताचा निकाल आला तो अनाकलनीय व अविश्वसनीय आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरही संशय निर्माण झाला आहे. मतदान संपल्यानंतर 58 टक्के जाहीर केलेले मतदार संघात दुसऱ्या दिवशी मात्र 66.5 टक्के दाखवून तब्बल 7.83 टक्क्यांची वाढ दाखवली. हा एक मोठा घोटाळा आहे,’ असा आरोप काँग्रेस कडून करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

‘निवडणूक आयोगाने निष्पक्ष व पारदर्शी निवडणूका घेणे त्यांचे कर्तव्यच आहे, पण त्यांच्यावरच संशयाचे ढग जमा होत असतील तर ते लोकशाही साठी घातक आहे. लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व निवडणूक आयोगावर निर्माण झालेले हे संशयाचे ढग दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीतील मॅच फिक्सिंगची चौकशी करावी,’ अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी माजी खासदार, आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg