loader
Breaking News
Breaking News
Foto

त्रिवेणि संगम ग्रुप आसुद आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील आसुद येथील त्रिवेणी संगम ग्रुप आयोजित विद्यार्थी गुण गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील आसुद येथील त्रिवेणी संगम ग्रुप हा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा, आरोग्य विषयक मोफत उपचार व मार्गदर्शन शिबिरे आदी विविध प्रकारच्या समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करणारा आणि सातत्य राखणारा तालूक्यातील एकमेव असा ग्रुप आहे. अशा ग्रुपकडून ग्रुपचे अध्यक्ष नंदकुमार बांद्रे यांच्या कल्पक नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांच्या एकोप्याने दरवर्षी वर्षभरात स्व खर्चाने विविध उपक्रम राबवले जातात तशाच प्रकारचा शैक्षणिकदृष्ट्या विदयार्थ्यांना प्रोत्साहन देणारा विदयार्थी गुण गौरव सोहळा उपक्रमाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याला विदयार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थांची उस्फूर्त अशी उपस्थित लाभल्याने कार्यक्रमाचा आयोजकांचा मुळ उद्देश सफल झाला.

टाईम्स स्पेशल

त्रिवेणी संगम ग्रुपचे अध्यक्ष नंदकुमार बांद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आसुद ग्रामदेवता झोलाई मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती योगिता बांद्रे, आसूद ग्राम पंचायतीचे सरपंच कल्पेश कङू, सीए. कौस्तुभ दाबके, आसुद ग्राम पंचायत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलिप बांद्रे, ग्रामपंचायत सदस्य कल्पेश माने, आसूद ग्रामस्थ मंङळाचे अध्यक्ष प्रकाश शिर्के. महिला मंडळ अध्यक्षा समृध्दी रेवाळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकाजी कानसे, आंबवली पोलीस पाटील रोषनी बङबे, दिलीप शिगवण, शांताराम जगदाळे, शंकर घुबङे. तसेच त्रिवेणि संगम ग्रुपचे सर्व सभासदांसह आसुद येथील ग्रामस्थ आणि विदयार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg