loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईत भाजप पदाधिकारी एकमेकांना भिडले : मंत्री आशिष शेलारांच्या गाडीसमोरच झाला राडा, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुंबईत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे समोर आले आहे. कांदिवली येथे भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. या बैठकीपूर्वीच भाजपच्या दोन गटात राडा झाला. आशिष शेलार यांच्या समोरच दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होवू शकते. त्यामुळे भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार हे मुंबईतल्या प्रत्येक प्रभागत भेटी देत आहेत. कार्यकर्त्यांना भेटत आहेत. त्यांची मते ही जाणून घेत आहेत. अशातच ते शुक्रवारी कांदीवलीत गेले होते. त्यावेळी त्यांच्या समोरच भाजपचे दोन गट एकमेकांना भिडले. यावेळी जोरदार राडा झाला. शेवटी प्रकरणी पोलिस स्टेशनपर्यंत ही पोहोचले. कांदिवली पूर्वेत जानुपाडा परिसरात मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार आज सकाळी व्हिजिटला आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. भाजपा पदाधिकारी देवांग दवे आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांचे समर्थक यावेळी एकमेकांना भिडले होते, असा आरोप केला जात आहे. आहा आरोप दोन्ही गट एकमेकां विरुद्ध करत आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार मंत्री आशिष शेलार यांच्या समोर झाला.

टाईम्स स्पेशल

पोलिसही त्यावेळी तिथे उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा तुफान राडा झाला. यानंतर समता नगर पोलिसांनी काही भाजपा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. शिवाय त्यांना पोलीस स्टेशनला आणले गेले. यावेळी कुणी विरुद्ध तक्रा दाखल करू नका अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. यावेळी भाजप पदाधिकारी असलेले देवांग दवे हे आक्रमक झाले होते. जो काय गोंधळ आज झाला. त्याची दखल पक्षाचे वरिष्ठ नेते नक्की घेतली. शिवाय संबंधितावंर कारवाई करतील असं आश्वासन मात्र भाजप कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg