केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : रात्री दोन तास ढगफुटीसारखा कोसळलेल्या मुसळधार पावसाने श्रीराम मंदिर नजीकच्या नाल्याला आलेल्या पुराचे पाणी तुंबल्याने नजिकच्या घरात गुडघाभर पाणी शिरुन नुकसान झाले. बसस्थानक नजिकच्या दुकानात महामार्गाचे पाणी शिरण्याची घटना रात्री अकरा वाजण्याच्या दम्याने घडली. पावसाने एकच हाहा:कार उडवून दिला. महामार्गाचे ठेकेदार यांनी रात्रीच नाल्याला बसविण्यात आलेले पाईप काढून टाकल्यानंतर तुंबलेले पाणी ओसरल्यामुळे मोठे नुकसान टळले.
काल रात्री साडेदहा वाजता पावसाने धोधो कोसळण्यास सुरुवात केली. विजांच्या कडकडाटासह कोसळणारा पावसाने दोन तासाच सर्वत्र पाणीच पाणी केले. शहरातील श्रीराम मंदिर नजिकच्या नाल्याला केव्हा पूर आला आणि पाणी तुंबून घरामध्ये शिरले हे कळलेच नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. यावेळेत लाईट गेली होती. सर्वत्र अंधार असल्याने काही करावे सुचत नव्हते.नाल्यानजीक असलेले रिजवान ईसानी, नौशाद नेवरेकर यांसह आजूबाजूच्या घरामध्ये गुडघाभर पाणी शिरून घरगुती साहित्याचे नुकसान झाले तसेच बसस्थानक नजिक रचना प्रिंटींग प्रेस सह इतर दुकानांसमोर गटार नसल्यामुळे महामार्गावरील पाणी दुकानात शिरून नुकसान झाले आहे. रात्रीच संबंधिताना कळविण्यात आल्यानंतर महामार्ग ठेकेदार यांनी नाल्यावर बसविण्यात आलेले पाईप रात्रीच काढून टाकल्याने मोठे नुकसान टळले असल्याचे बोलले जात आहे.
महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे श्रीराम मंदिर नजीकच्या नाल्यावर पुलाचे बांधकाम अर्धवट असून पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकून तात्पुरती सुविधा केली आहे. परंतु मोठ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळेच पाणी तुंबून घरामधे शिरुन नागरिकांचे नुकसान झाले तसेच गटारांची कामे अर्धवट असल्यानेच रस्त्यानजिकच्या दुकानात पाणी शिरत असल्याचे बोलले जात आहे. तातडीने गटार बांधण्याची मागणी व्यापारी वर्गातून केली जात असून मुसळधार कोसळणार्या पावसात सतत त्रास आणि नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.