loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर नायरी हा रस्ता मुसळधार पावसामुळे बंद

संगमेश्वर (सत्यवान विचारे) मुसळधार पावसामुळे संगमेश्वर कसबा संगम या ठिकाणी या शास्त्री वं अलकनंदा या नदिने मंदिराला पाण्याने वेढा घातला असून नायरी फणसवणे वं कसबा संगमेश्वर हा रस्ता बंद असून शाळेत जात असलेले शिक्षक शाळेत न जाता येथेचं थांबले आहेत. कसबा येथून नायरी,शृंगारपूर नेरदवाडी,तांबेडी, उमरे,कळंबस्ते,फणसणे आदी दहा गावातील संपर्क तुटल्याने विविध ठिकाणी शाळेत, महाविद्यालयात जाण्याऱ्या विदयार्थ्यांन बरोबर शिक्षक अडकून पडले आहेत. आज शाळेचा पहिलाच दिवस असल्याने ज्या उत्साहाने विदयार्थी शाळेत जाण्यासाठी निघाले होते त्यावर पावसाने पाणी फिरवले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जागोजागी पुरस्थिती निर्माण झाली असुन कसबा उर्दू शाळे जवळली पोकळ पऱ्या वर पाणी भरले असुन जवळील साया स्टॉप जवळील मुस्लिम मोहल्ला येथील घरात पाणी शिरले आहे. अलकंनंदा संगामावरील संगमेश्वराच्या मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. फणसवणे जखमाता मंदिर आणि केदारलिंगाच्या मंदिराजवळ पाणी रस्त्यावर आल्याने वरील दहा गावंचा संपर्क तुटला आहे. शास्त्री आणि सोनवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर असाच राहिलास संगमेश्वर बाजारपेठ पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने अपत्कालीन व्यवस्था सज्ज झाली असुन गरजे व्यतिरिक्त वकोणीही बाहेर पडू नये असे संगमेश्वर पोलिसांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg