सावंतवाडी : वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी जी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार १८ जून रोजी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि रुद्रपुजा आयोजित करण्यात आली आहे. दोन टप्प्यात हा कार्यक्रम होणार असून श्रीधर अपार्टमेंट येथे दर्शन सोहळा होणार आहे. १ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा दर्शन सोहळा होणार आहे. पूर्णपणे मोफत असा हा सोहळा असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी शालेय शिक्षणमंत्री आम. दीपक केसरकर यांनी केले आहे.
श्री. केसरकर म्हणाले, अकराव्या शतकात, (इ.स. १०२६ मध्ये) कूर महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर चढाई केली होती. पवित्र शिवलिंगाचे तुकडे तुकडे केले. मंदिर नष्ट झाले होते. पण, काही निष्ठावंत पुजाऱ्यांनी गुपचूप त्याचे काही अवशेष वाचवले. या पवित्र अंशाना त्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन लपवले आणि पिढ्यानपिढ्या हे रहस्य जपले गेले. जवळपास एक हजार वर्षे, हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित राहिले व भक्तांच्या श्रद्धेने जिवंत ठेवले गेले. कालांतराने, नियतीच्या खेळाने हे अवशेष गुरुदेव श्री श्री श्री रविशंकर यांच्यापर्यंत पोहोचले. काही संत म्हणतात, हा दैवी संकेत होता. प्राचीन पुजारी पुरोहितांच्या वंशजांनी गुरुदेवांना हे पवित्र अंश सुपूर्द केले. गुरुदेवांनी त्यांचे आध्यात्मिक महत्त्व ओळखून भक्तांसाठी महाशिवरात्रीच्या भव्य सोहळ्यात याचा लिंगाभिषेक केला. हेच शिवलिंग आता सावंतवाडीत येत आहे. त्याचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी १७ जून रोजी कणकवली येथे तर बुधवार १८ जून रोजी यावेळेत सकाळी ९ ते १० रुद्रपुजा व सकाळी १०.३० ते १२.३० दर्शन अर्थात रुद्रपुजा संकल्प होणार आहे.
हा कार्यक्रम श्रीधर अपार्टमेंट, एसटीस्टॅण्ड समोर, सावंतवाडी येथे होणार आहे. या शिवलिंगाचे दर्शन घेता येणार आहे. हे दर्शन सर्वांसाठी मोफत असेल. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री आमदार श्री.केसरकर यांनी केले आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर, अशोक दळवी, विद्याधर परब, आर्ट ऑफ लिव्हिंगचे हर्षल नाडकर्णी, दीपा सावंत, आनंद पोयेकर, बाळकृष्ण सावंत,परिक्षित मांजरेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.