loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प.आदर्श केंद्र शाळा खेर्डी नं. १ येथे शाळा प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) : चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा खेर्डी नं. १ येथे नुकताच शाळा प्रवेशोत्सव दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी शाळा प्रवेशोत्सव दिनाची सुरुवात इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थांचे सजावट केलेल्या गाडीमधून ढोल ताशांच्या गजरात अत्यंत उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यार्थांचे शालेय परिसरात आगमन होताच औक्षण करण्यात आले व विद्यार्थांवर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर आकर्षक अशा सेल्फी पॉईंटमध्ये विद्यार्थांचे आणि मान्यवरांचे फोटोग्राफ्स घेण्यात आले त्यानंतर विद्यार्थांच्या स्वागतासाठी फुलांचा गालिचा टाकण्यात आला या गालिच्यावरुन चालताना विद्यार्थांचा आनंद ओसांडून गेला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभागृहात प्रवेश करताना विद्यार्थांच्या पहिल्या पावलांची "पाऊलखुण " अर्थात पायांचा ठसा घेण्यात आला "पाऊल खुणा" उमटवणे हा विद्यार्थांसाठी एक आगळा वेगळा अनुभव होता. विद्यार्थांचे शाळेतील पहिले पाऊल अर्थात "पाऊल खुण" रुपाने दिर्घकाळ टिकून राहाव्यात यासाठी हे ठसे पालकांकडे सुपूर्त करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या सजावट केलेल्या वर्गाचे उदघाटन खेर्डी गावचे उपसरपंच अभिजीत खताते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून व सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन वर्गात प्रवेश केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रवेशोत्सवा निमित्त सभा घेण्यात आली. यावेळी सुत्रसंचालन करताना पदवीधर शिक्षक दिपक रूपात यांनी "शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा, शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळे तरळते कधीतरी डोळ्यात पाणी" अशी काव्यरचना सादर करुन मान्यवरांचे शाब्दिक स्वागत केले व शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ सदस्य अनंत दाभोळकर यांची अध्यक्ष म्हणून निवड केली त्यास उपशिक्षिका श्रीमती. त्रिशला तलवारे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन प्रवेशोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. माधवी जंगम यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, उपसरपंच अभिजीत खताते यांचे हस्ते इयत्ता पहिली मध्ये दाखल होणा-या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प पाठ्यपुस्तक, गणवेश, चॉकलेट आदी. भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले तसेच माजी उपसरपंच व भारतीय जनता पक्षाचे चिपळूण तालुका अध्यक्ष विनोद भूरण यांचे हस्ते व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर खेर्डी केंद्र प्रमुख दिपक यादव यांचा विनोद भुरण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षिका श्रीमती. कल्याणी भागवत यांनी अभ्यासक्रमातील बदल आणि शिक्षकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर विनोद भुरण यांनी प्रवेशोत्सवाचे महत्त्व स्पष्ट करुन शुभेच्छा दिल्या त्यानंतर केंद्रप्रमुख दिपक यादव यांनी विद्यार्थांसाठी जि.प.च्या योजना सांगून विद्यार्थ्यांना जि. प. शाळेतच दाखल करण्याचे आवाहन केले. अनंत दाभोळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती. नेहा सुर्वे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका माधवी जंगम, उपशिक्षिका श्रीमती. शर्वरी खताते, श्रीमती. सायली वरेकर, श्रीमती. चव्हाण, श्रीमती. भागवत, श्रीमती. सुर्वे, श्रीमती. गुरव, दिपक रेपाळ. श्रीमती. तलवारे, वाघडोळे, फोटो ग्राफर दिपक वाघडळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg