लांजा - (वार्ताहर) - तालुक्यात १३ ते १६ जून या कालावधीत पडलेल्या पावसाने तालुक्याला झोडपून काढले असून या कालावधीत एकूण ७ लाख ७८ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार आघाडी घेत पावसाने तालुक्यात घरे आणि गोठे यांचे प्रचंड नुकसान केले आहे. १३ ते १६ जून या कालावधीत पडलेल्या पावसाने लांजा तालुक्यात मोठी हानी केली आहे.
यामध्ये तालुक्यातील उपळे येथील चंद्रकांत वीर यांच्या गोठ्याचे २० हजार रुपये, भडे येथील संजय सुर्वे यांच्या गोठ्याचे २ लाख ८८ हजार रुपये त्याचप्रमाणे वाडीलिंबू येथील पांडुरंग मोरे यांच्या गोठ्याचे ३१ हजार रुपये तर कोट आगरगाव येथील तुकाराम गोरुले यांच्या गोठ्याचे ४८ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. लांजा शहरातील श्रीरामपूल येथे राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार कंपनीने तयार केलेल्या पर्यायी मार्गामुळे येथील वहाळाला आलेल्या प्रचंड पुराचे पाणी घरात घुसून लांजा शहरातील रिजवान ईसानी यांच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, तांदूळ, गहूपीठ याबरोबरच फ्रीज, बेड, बेडवरील गाद्या यांचे एकूण सुमारे २५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे घरात पाणी घुसून देखील मोठ्या प्रमाणात अनेकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पनोरे येथील शांताराम चव्हाण यांचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर पनोरे येथील गीतांजली मोरे यांचे ४४ हजार २०० रुपये, शिवराम मोरे यांचे २७ हजार रुपये, भागीर्थी मौर्य यांचे २० हजार रुपये, नारायण नरसले यांचे १७ हजार ४०० रुपये, अनिकेत नरसले यांचे ६८ हजार रुपये, सचिन नरसले यांचे ३८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रतिभा नरसले यांचे १४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर साटवली येथील लक्ष्मण सोनू तरळ यांचे १४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर साटवली येथील कृष्णा सदू तरळ यांचे ४१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच सचिन तरळ यांचे ३४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पुनस येथील सुरेंद्र भागवत यांचे ८,६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गोळवशी येथील रमेश वीर यांचे ३ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, तालुक्यातील चार गोठ्यांचे मिळून ३ लाख ८९ हजार ७०० रुपये तर १३ घरांचे एकूण ३ लाख ६५ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे एकूण ७ लाख ७८ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची नोंद लांजा महसूल विभागात करण्यात आलेली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.