loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

खेड (प्रतिनिधी) : श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचालित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई.वेरळमध्ये दिनांक १७ जून २०२५ ते १८ जून २०२५ रोजी इ. १ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची सार्वजनिक आरोग्य सेवा, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी, राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबिरामार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. परेश मळंगावकर, डॉ.कु. शितल मारकळ (आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी ) व त्यांच्या समवेत परिचारिका सौ.मेधा मळंगावकर, सौ. प्राची आखाडे, प्रदीप सूर्यवंशी, दिपाली महाडिक व संयोगी सकपाळ यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आरोग्याबद्दल विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संस्थेचे संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, संस्थेचे खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ .एस. एस .अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg