loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली तपासणी नाका येथे गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त, दोन संशयीत ताब्यात

बांदा (प्रतिनिधी) - गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीवर इन्सुली तपासणी नाका पथकाने मोठी धडक कारवाई करत तब्बल २३ लाख ७३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १३ लाख ४१ हजार ६०० रुपयांच्या दारूसह ट्रक व बॅरल असा मोठा माल ताब्यात घेण्यात आला असून, गुजरातमधील दोन संशयितांना अटक करण्यात आली. दिनेशभाई नवलसिंग संगाडा (२५) आणि रोहित अशोकभाई यादव (२२) अशी त्यांची नावे आहेत. गोव्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळताच इन्सुली पथक सतर्क झाले. पहाटेपासूनच तपासणी नाक्यावर गस्त वाढवून सापळा रचण्यात आला. दरम्यान, गोव्याहून संशयितरित्या वेगाने येणारा जीजे ०१ एचटी ०७९४ हा ट्रक तपासणीसाठी थांबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तपासणीदरम्यान ट्रकमधील बॅरलमध्ये केमिकल पावडरच्या थराखाली नीट लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. उघडझाप केल्यावर २१५ बॉक्समधील तब्बल १० हजार ३२० बाटल्या समोर आल्या. बाजारभावानुसार या मालाची किंमत १३.४१ लाख रुपये इतकी निघाली. ट्रक आणि बॅरल धरून एकूण जप्ती २३.७३ लाख इतकी झाली. संपूर्ण कारवाई जिल्हा अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विवेक कदम, धनंजय साळुंखे, जवान दीपक वायदांडे, रणजीत शिंदे, अभिषेक खत्री यांच्या पथकाने कौशल्यपूर्वक पार पाडली. चालक आणि क्लिनरला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg