रत्नागिरी (प्रतिनिधी) : येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या प्रांगणात बुधवारी दि. १९ नोव्हें. २०२५ रोजी ‘‘मोफत चेकअप आरोग्य शिबीर’’ आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा सर्व वयोगटातील नागरिकांनी व बंधू भगिनींनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर संस्था व एस्कलेपीयस वेलनेस या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे ‘‘मोफत चेकअप आरोग्य शिबीर’’ संपन्न होईल. हे ‘मोफत चेकअप आरोग्य शिबीर’ बुध. दि. १९ नोव्हें. २०२५ रोजी स. ११ ते दु. २ या वेळेत श्रीराम मंदिर, रत्नागिरीच्या प्रांगणात होणार आहे. या शिबिरात श्री. करुण भानत, हेल्थ ऍडव्हायझर व डॉ. सचिन पवार हे उपस्थितांचे चेकअप करुन आजारांचे निदान करतील व उपाय सुचवतील. तसेच यावेळी अत्यंत माफक दरात औषधे उपलब्ध असतील, अशी माहिती सौ. मनिषा पाटील व सौ. सारिका अविनाश पावसकर यांनी दिली.
या शिबीरात डायबेटीस, कॅन्सर, मूळव्याध, अल्सर, संधीवात, मान/पाठ दुखणे, विसराळूपणा (अल्झायमर), मूतखडा, मासिक पाळीचे आजार, स्त्रियांचे आजार, थायरॉईड, केसगळती, सफेद डाग, गर्भधारणा न होणे, वजन वाढविणे, अर्धशिशी, त्वचा रोग, चष्मा लागणे, किडनी प्रॉब्लेम, टीबी, लिव्हर प्रॉब्लेम, हर्निया, डायलेसिस, हृदयरोग, पॅरालेसिस, अपेंडीक्स आदी विविध विकारांसाठी चेकअप करुन मार्गदर्शन करण्यात येईल. या ‘मोफत चेकअप आरोग्य शिबीरा’ला सर्व वयोगटातील नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थेच्यावतीने श्री. संदीप डोंगरे, श्री. विनायक हातखंबकर, श्री. रमाकांत पांचाळ, श्री. सुनिल नलावडे, श्री. नित्यानंद दळवी, श्री. दीपक राऊत, श्री. अशोक आंबवकर यांनी केले आहे.






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.