loader
Breaking News
Breaking News
Foto

खेरवसे गावात बिबट्याची दहशत; लोकवस्तीत शिरून बिबट्याच्या डरकाळ्या

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील खेरवसे गावात गेली दोन दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला असून रात्री-अपरात्री लोकवस्तीत शिरून जोर जोरात डरकाळ्या फोडणाऱ्या बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. लांजा तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा दहशतीच्या घटना घडल्या असतानाच बिबट्याने आपला मोर्चा खेरवसे गावात वळविला आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस बिबट्या खेरवसे बौद्धवाडी, गुरववाडी मध्ये सायंकाळी, रात्री-अपरात्री नागरिकांच्या नजरेस पडतो आहे. रविवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान बिबट्या बौद्धवाडी येथे एका झाडावर बसलेला दिसून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागरिकांनी आरडा ओरडा केला असता बिबट्या उडीमारून बाजूच्या जंगलात पसार झाला. त्यानंतर पुन्हा पंधरा मिनिटाने बिबट्या घरांच्या शेजारी येऊन जोर जोरात ओरडत असल्याने नागरिकांनी पुन्हा बिबट्याला पिटाळून लावले. मात्र तासाभराने बिबट्या लोकवस्तीत शिरला व जोरजोरात ओरडू लागला. त्यामुळे नागरिक बिबट्याने दहशती खाली वावरत आहेत. बौद्धवाडी येथील दोन घरांच्या अंगणात येउन बिबट्या डरकाळ्या फोडू लागल्याने रविवारी व सोमावरी नागरिकांवर रात्र जागून काढण्याची वेळ आली. रात्री पासून ते पहाटेपर्यंत बिबट्या ओरड होता. तर मंगळवारी रात्री बिबट्या लोकवस्ती शिरून कधी रस्त्यात आडवा तर कधी नागरीकांच्या घरांच्या बाजूला येऊन ओरडत राहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाइम्स स्पेशल

गेली दोन दिवस नेहमी डरकाळ्या फोडणारा बिबट्या जखमी झालेला असावा असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी खेरवसे गावच्या नागरिकांनी केली आहे. याबाबतची माहिती नागरिकांनी लांजा वनविभागाला दिली असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg