खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यात वाढणारे मुलांवरील अत्याचार, पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि बालविवाह यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आदिवासी, मागासवर्ग व इतर सर्व गावकरी, शिक्षक व पालकांमध्ये जनजागृती करण्याचे दृष्टीने बाल कल्याण समिती, रत्नागिरी जिल्हा या समितीच्या सदस्य व अधिवक्ता परिषद कोकण प्रांत विभागाच्या उपाध्यक्षा अधिवक्ता प्रिया उमेश लोवलेकर आणि पोलीस उपनिरीक्षक समेल सुर्वे यांच्या संकल्पनेतून समाज प्रबोधनात्मक उपक्रमाची रचना करण्यात आली. त्याकरिता खेड तालुका अधिवक्ता परिषद व खेड पोलीस ठाणे तसेच बाल कल्याण समिती यांच्या सहकार्याने खेड तालुक्यातील आवाशी, कुडोशी व सुकदर या गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन व व्याख्याने आयोजित केले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा कुडोशीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
अधिवक्ता परिषद कोकण प्रांत रत्नागिरी जिल्हाचे सहसचिव अधिवक्ता सिद्धेश बुटाला यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या कार्याची उपस्थितांना माहिती सांगितली व कार्यक्रमाची सुरुवात केली. अधिवक्ता परिषद कोकण प्रांत खेड तालुका संघटन आयाम मंत्री अधिवक्ता स्वप्नील खोपकर यांनी या कार्यक्रमात बाल हक्क व्यवस्था व पॉक्सो कायदा या विषयावर उपस्थितांना विस्तृतपणे मार्गदर्शन केलेतसेच लहान मुलांना कायदा म्हणजे काय?, आजू बाजूच्या परिसरात मुलांनी कसे वागावे तसेच मुलांना चांगले-वाईट स्पर्श ओळखण्याची समज, शिक्षक बालक आणि विद्यार्थी किंवा मुलं यांच्यामधील आवश्यक असलेला सुसंवाद इत्यादी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आवाशी येथील पोलीस पाटील तथा पोलीस पाटील संघटना जिल्हाध्यक्ष संदीप गमरे यांनी देखील मुलांना स्वयं संरक्षण कसे करावे या बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर खेड तालुका आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. श्रीधर भिलवडे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शनातून उपस्थितांना लैंगिक अत्याचार व त्याचे समाज आणि लहान मुलांवर होणारे परिणाम याविषयी उदाहरणासह माहिती दिली. यावेळी अधिवक्ता परिषद कोकण प्रांत खेड तालुका यांचेकडून शाळेतील मुलांना फळ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला अधिवक्ता परिषदेचे रत्नागिरी जिल्हा सहसचिव अधिवक्ता सिद्धेश बुटाला, अधिवक्ता परिषद कोकण प्रांतचे कार्यकारणी मधील कार्यालयीन मंत्री अधिवक्ता प्रितेश जाधव, ॲड. प्रा. दिलीप चव्हाण, कुडोशी गावचे सरपंच संचीला फागे, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण खेडेकर, पोलीस पाटील प्रकाश खेडेकर, शाळेच्या मुख्याध्यापक बाजीराव पाटील, व शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कुदोशी गावातील महिला व पुरुष नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.