loader
Breaking News
Breaking News
Foto

थंडीच्या प्रमाणात झाली वाढ; पारा घसरला; जिल्ह्यात 'हुडहुडी' वाढली !

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - गेल्या आठवड्यापासून थंडीचे प्रमाण खेड तालुक्याबरोबर खाडीपट्ट्यामध्ये वाढले असून खेड शहर आणि ग्रामीण भागात सुद्धा गारवा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शेकोटी पेटू लागल्या असून शेकोटी जवळ सामूहिक गप्पा सुद्धा रंगू लागल्या आहेत. ग्रामीण भागात आठवडाभरापासून जिल्ह्यात हिवाळ्याची चाहूल लागली होती; मात्र मागील दोन दिवसांत गारवा वाढला आहे. शनिवारपासून पारा खाली आल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात थंडीचे प्रमाण जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर्षी पाऊस जास्त पडल्याने थंडीही जास्त पडणार असे बोलले जात आहे. नोव्हेंबरच्या प्रारंभी थंडीचा मागमूसही नव्हता; पण अचानक वातावरणातील बदलामुळेजिल्हा गारठून गेला आहे. कार्तिकी पौर्णिमेनंतर गुलाबी थंडीने अचानक वेग घेतला आणि काहीच दिवसांत कडाक्याच्या थंडीनं नागरिकांना घराबाहेर पडताना हुडहुडी भरू लागली आहे. हवामान खात्याने नोंदविल्याप्रमाणे, गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात घट दिसून आली असून, त्यामुळे थंडीच्या कडाक्यात भर पडली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्यावरसुद्धा परिमाण होत आहे. खारेपट्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या तक्रारी वाढल्याने शहर व ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये रुग्ण दिसून येत आहेत. हवामानातील बदल शरीराला पचनी न पडल्याने विशेषतः मुलांमध्ये व ज्येष्ठांमध्ये त्रास अधिक जाणवत आहे.

टाईम्स स्पेशल

थंडीमुळे पहाटेच्या शाळेला जाणाऱ्या चिमुकल्यांना तसेच त्यांना सोडण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना आता उबदार स्वेटर शिवाय पर्याय उरला नाही. थंडीची लाट वाढताच अनेक ठिकाणी शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. यासोबतच गरम चहा, कॉफीची मागणी वाढली आहे. अजून थंडीचे प्रमाण वाढणार असून हवामान विभागाच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या उत्तरार्धात जिल्ह्यात आणखी कडाक्याची थंडी जाणवू शकते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg