तिलारी (प्रतिनिधी) - बेळगाव-गोवा मुख्य मार्गावर वायंगणतड येथे कित्येक दिवसांपासून पडलेला एक मोठा आणि धोकादायक खड्डा अखेर स्थानिक गावकर्यांनी, विशेषतः तरुण युवकांनी, स्वखर्चाने पुढाकार घेऊन बुजवला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा खड्डा मार्गावर मध्यभागी असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. अनेक दिवसांपासून या खड्ड्यामुळे लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दोडामार्ग ते विजघर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तो महाराष्ट्र राज्य मार्गकडे वर्ग केला जातो. अद्याप काम सुरू नाही पण रस्ता देखरेख करणे संबंधित कंपनीची जबाबदारी होती. संबंधित कंपनीने लक्ष घातले नाही यामुळे संताप व्यक्त केला.
अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रशासनाच्या कार्यवाहीची वाट न पाहता, गावातील लवू नाईक, लव्हली अल्फोन्सो व इतर उत्साही युवकांनी एकत्र येत श्रमदान केले. त्यांनी स्वतःच्या पैशातून साहित्य खरेदी करून हा खड्डा तातडीने बुजवला. युवकांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्य मार्गावरील खड्डा बुजवण्यासाठी गावकर्यांना स्वखर्चाने पुढाकार घ्यावा लागणे, हे संबंधित ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष म्हणावे लागेल. कंपनी, संबंधित खाते विभाग लक्ष देत नसल्यामुळे आम्ही स्वतःच तो बुजवण्याचा निर्णय घेतला. लोकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. युवकांच्या या तत्परतेमुळे मार्गावरील धोका टळला असला तरी, संबंधित विभागाने वेळीच लक्ष देणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.