loader
Breaking News
Breaking News
Foto

पीरलोटे येथे स्विफ्ट कारच्या झालेल्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

खेड (वार्ताहर) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील पीरलोटे येथील ओव्हर ब्रिजवर सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एमएच ०२ डीएन ७२३४ चा कार चालक संशयीत आरोपी पुनीत नारायण नायक (वय ३९ रा. पीरलोटे ता. खेड जि. रत्नागिरी) याने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा चालक अल्ताफ हसन ठाकूर याचा मृत्यू झाला आहे. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय संभाजी भोसले यांनी फिर्याद दिल्यानुसार येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संशयीत आरोपी पुनीत नारायण नायक (वय ३९ रा. पीरलोटे ता खेड जि रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार हयगयीने अविचाराने आणि आपली लेन सोडुन दुस-या लेनवर जावुन चालवित असताना चिपळूण येथून पीरलोटेकडे येणारी ऑटोरिक्षा क्रमांक एमएच ०८ बीसी २७८७ या रिक्षेच्या पुढील उजव्या बाजुच्या ढे-याजवळ धडक देऊन झालेल्या अपघातास कारणीभूत व रिक्षा चालक अल्ताफ हसन ठाकुर यांच्या छोट्या मोठ्या दुखापतीस आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी स्विफ्ट कार चालक पुनीत नारायण नायक याचेवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg