loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रथमेश कदमने आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवला तिरंगा!

रत्नागिरी - लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, शिवार, आंबरे रत्नागिरी येथील विद्यार्थ्याने भूतान येथे नुकत्याच झालेल्या संयुक्त भारतीय खेल फाउंडेशन 12th आंतरराष्ट्रीय गेम्स २०२५ मध्ये सुवर्णपदक जिंकून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविद्यालयात SYBA मध्ये शिक्षण घेत असलेला कुमार प्रथमेश राजेश कदम याने पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ही अतुलनीय कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशासाठी सुवर्णपदक मिळवल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रथमेश कदम याच्या या यशाने केवळ महाविद्यालयाचीच नाही, तर संपूर्ण परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे. त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रथमेशचे अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg