loader
Breaking News
Breaking News
Foto

२१ नोव्हेंबरला नानोडा शांतादुर्गा कळंगुटकरीण देवीचा जत्रोत्सव

प्रतिनिधी : डिचोली तालुक्यातील असनोडा-नानोडा येथे श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण देवीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध धार्मिक विधींनी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. भंडारी समाजाची कुलदेवता मानल्या जाणाऱ्या श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण देवीबद्दल कळंगुटकर आडनावाचे अनेक भाविक कारवार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गुहागर, मुंबई, पुणे, हैदराबाद, सावंतवाडी, वेंगुर्ला, शिरोडा आदी भागांत स्थायिक असून, जत्रोत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जत्रोत्सवाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- सकाळी श्रींची नित्य पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येईल, भाविकांसाठी ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, दुपारी श्रींचा महानैवेद्य व महाप्रसादाचे आयोजन, मध्यरात्री १२ नंतर श्रींची पालखी गावात भव्य मिरवणुकीसह नेण्यात येणार आहे, त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळातर्फे दशावतारी नाट्यप्रयोग होईल, पहाटे गवळणकाळ्याने जत्रोत्सवाचा समारोप होणार आहे या जत्रोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीदेवी शांतादुर्गा कळंगुटकरीण देवस्थान समितीने केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg