रत्नागिरी : सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल रत्नागिरी (शहर) यांच्यामार्फत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन केले होते. आगामी निवडणुकीच्या माध्यमातून सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे, तसेच मतदान आपला हक्क बजावणे यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी ही प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेतील इयत्ता आठवीचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्या समवेत शाळेतून प्रभात फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर गाडीतळ तसेच पोस्ट ऑफिसकडून रामआळी, मच्छी मार्केट मार्गे ही प्रभात फेरी पुन्हा शाळेत येऊन समाप्त झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानासंदर्भात विविध घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थी मतदानाबद्दल माहिती देत आहेत हे समजल्यानंतर लोकही थांबून घोषणा ऐकत होते.
मतदानाचे महत्त्व सर्वांना समजावे यासाठी शासनाच्या वतीने हा उपक्रम साजरा करण्याचे सांगण्यात आले होते. मुलांनाही याबद्दल माहिती मिळाली तसेच त्यांनीही मतदान प्रक्रिया व मतदान प्रक्रियेतील मतदान करण्याचा अधिकार याची माहिती समजून घेतली. ही प्रभात फेरी यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने ही मतदान जनजागृतीची प्रभात फेरी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.