loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाचा संशोधन सहकार्यासाठी करार

दापोली (प्रतिनिधी) - दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाने नुकताच इनफायनाइट बायोटेक् इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड ॲनालिटिक्स् या सांगली येथील संस्थेसोबत संशोधनासाठी करार (MOU) केला आहे. महाविद्यालयात झालेल्या या करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या संस्थेतील संशोधन सुविधा अल्प दरात उपलब्ध होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंगसाठी या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विविध संशोधन प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या संस्थेचे सहाय्य मिळणार आहे. हा करार होताना इनफायनाइट बायोटेक् इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि संचालक श्री. माजीद खलाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. विक्रम मासाळ, डॉ. निवास देसाई,डॉ. नंदा जगताप, डॉ. बापू यमगर, डॉ. गंगा गोरे इ. उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg