loader
Breaking News
Breaking News
Foto

एचपीव्ही लसीकरण उपक्रम यशस्वी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण

संगलट( खेड) (इक्बाल जमादार) - केळशी येथील कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र केळशी आणि उपकेंद्र उटंबर यांच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही (HPV) लसीकरण सत्र यशस्विरित्या पार पडले. शाळेतील अनेक विद्यार्थिनींना लसीकरण करून त्यांचे आरोग्य संरक्षण अधिक सक्षम करण्यात आले. लसीकरणानंतर सर्व विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली गुहागरकर व डॉ. योगेश्वरी राठोड, तसेच समुदाय आरोग्य अधिकारी राहुल आंधळे, उपकेंद्र उटंबर येथील कर्मचारी, शाळेचे शिक्षक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

HPV लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलींच्या निरोगी भविष्यासाठी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे यांनी यावेळी केले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे व त्यापासून प्रतिबंध करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून, या मोहिमेला पालक आणि शाळेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg