रत्नागिरी (वार्ताहर) - केंद्रीय व राज्य सरकारी विभागांमधील सुसंवाद, सहकार्य आणि आपलेपणा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कस्टम्स, रत्नागिरी विभागामार्फत आयोजित “पुणे कस्टम्स युनिटी कप” आंतर-विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सावंत ओएसिस क्रिकेट अरेना, कोलाम्बे येथे रंगणार आहे. या स्पर्धेत विविध सरकारी यंत्रणा आणि औद्योगिक क्षेत्रातील नामांकित संस्थांचे सहा संघ मैदानात उतरतात. त्यात जीएसटी पुणे, कस्टम्स पुणे, रत्नागिरी पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, JSW जयगड पोर्ट आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. यांचा समावेश आहे.या स्पर्धेचे उद्घाटन पुणे कस्टम्स आयुक्त श्री. डी. अनिल यांच्या हस्ते होणार असून, जीएसटी विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, JSW पोर्ट आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सरकारी कामकाजाच्या चौकटीबाहेर जाऊन परस्पर संबंध दृढ करण्यासाठी ही क्रीडा स्पर्धा महत्त्वाची ठरणार असून, सहभागींनी खेळाडूवृत्ती, संघभावना आणि उत्साह या मूल्यांसह खेळावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, "हा पुढाकार आपल्याला स्मरण करून देतो की, विविध क्षेत्रांमध्ये काम करत असलो, तरी आपण सर्वजण सार्वजनिक सेवेसाठी कार्यरत असलेल्या एका समान ध्येयाचे घटक आहोत." या उपक्रमात सहायक आयुक्त श्री. संदीप कृष्णा, कार्यकारी अधिकारी श्री. विजय राणा, अधिक्षक श्री. अतुल गायकवाड, अधिक्षक श्री. लक्ष्मीकांत शंकर भाटकर आदी मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.सरकारी संस्था व उद्योग क्षेत्र यांच्यातील संवादाचा पूल मजबूत करणाऱ्या या स्पर्धेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.