loader
Breaking News
Breaking News
Foto

साखळोली-शिवाजीनगर येथील रस्ता आणि पुलाची अत्यंत दयनीय अवस्था

संगलट-खेड (इक्बाल जमादार) - कोकणातील पर्यटनाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या दापोली तालुक्यातील विकासाचा दावा फोल ठरताना दिसत आहे. तालुक्यातील साखळोली गावातील शिवाजीनगर वाडीकडे जाणार्‍या रस्त्याची आणि तेथील पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्‌ड्यात रस्ता? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुलावरच्या लोखंडी शिगा उखडून वर आल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साखळोली-शिवाजीनगरला जोडणारा पूल सध्या जीर्ण अवस्थेत आहे. पुलाचे कठडे काही ठिकाणी तुटले असून, पायाही कमकुवत झाला आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी जात असल्याने, तर इतर वेळी जीव मुठीत धरून ग्रामस्थांना आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. एखादा मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दुचाकीस्वारांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि रुग्णांना या रस्त्यावरून दवाखान्यात नेणे म्हणजे एक दिव्यच ठरत आहे. रिक्षाचालकही खराब रस्त्यामुळे या भागात येण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या रस्त्याच्या आणि पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र दरवेळी केवळ आश्वासने मिळतात, प्रत्यक्ष काम होत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg