loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूल खेडमध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव उद्घाटन सोहळा संपन्न

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या क्रीडांगणामध्ये वार्षिक क्रीडामहोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न झाला. सदर क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याची मंगलमय सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर खेड तालुक्याचे तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सुधीर सोनवणे यांचे स्वागत संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, रोपटे व पुस्तकरुपी भेट देऊन करण्यात आले. तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी पुस्तकरुपी भेट देऊन केले. प्रमुख मान्यवर सुधीर सोनवणे यांच्या हस्ते क्रीडांगणावरील ध्वज फडकवून सर्वांनी क्रीडास्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी खेळाविषयीची प्रतिज्ञा घेतली. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व भव्य मशाल ज्योत पेटवून शालेय वार्षिक क्रीडामहोत्सवाला प्रारंभ झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोटरी शाळा ही खेळ आणि क्रीडापटू यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे वार्षिक क्रीडामहोत्सव हा सर्व विद्यार्थ्यांचा आवडता कार्यक्रम असतो. यंदा हा क्रीडामहोत्सव दि. २१ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत रोटरी स्कूलच्या मैदानावर यशस्वीरित्या संपन्न होणार आहे. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत संचलन केले. कु. दुर्वांकूर देवघरकर याने पुरलेला मल्लखांब यावर मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा जल्लोष नृत्य सादर केले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यामध्ये योगा खेळप्रकारामध्ये कु. दळवी, कु. श्लोक दळवी, कु. शाश्वत धुमाळ, कु. आयुष पाटील, कु. स्पंदन धामणे, कु. प्रांजल आंबेडे, कु. अनुष्का म्हातले, कु. इशदा भोसले, कु. श्रावणी दिवेकर, मल्लखांब खेळप्रकारामध्ये कु. दुर्वांकूर देवघरकर, कराटे खेळप्रकारामध्ये कु. शुभम भंडारे, स्केटिंग या खेळप्रकारामध्ये कु. मृणाल भोसले, कु. स्वराज पवार, तायक्वॉंडो या खेळप्रकारामध्ये कु. आयुष जाधव, कु. रुद्र आदवडे, कु. रुद्र शिगवण, कु. अर्णव गोफणे, कु. विधी गोरे, कु. सई चाळके, कु. ईश्वरी गोरे या खेळाडूंचा व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांमध्ये क्रीडाशिक्षक कृणाल चव्हाण, सौ. शितल घाणेकर, दिपक कदम, विजय केळसकर, तायक्वॉंडो प्रशिक्षक पंचशील चव्हाण, योगप्रशिक्षक डॉ. गौरव आंब्रे, स्केटिंग प्रशिक्षक विजय निगडेकर, संगीत प्रशिक्षक अभिषेक जोशी, नयन कीरडवकर, सौ. कर्णिका निगडेकर, नृत्य प्रशिक्षिका सौ. श्वेता चव्हाण, सौ. प्रिया जोशी, पियानो प्रशिक्षक वैभव माटवणकर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.

टाइम्स स्पेशल

क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे खेड तालुक्याचे तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सुधीर सोनवणे यांनी आपल्या मनोगतामध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडाक्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत घेतलेली यशस्वी झेपही उल्लेखनीय बाब आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही रोटरी स्कूलमध्ये क्रीडाक्षेत्राला अग्रगण्य स्थान आहे ही वैशिष्ट्‌याची बाब आहे, असे सांगितले. शाळेतील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील अनुकूल वातावरण पाहून इंजिनिअर, डॉक्टर याबरोबरच राष्ट्रीय खेळाडू नक्कीच बाहेर पडत राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. रोटरी स्कूलमधील सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी हे उपक्रमशील व प्रयत्नशील आहेत. यामुळेच आज रोटरी स्कूल शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात नावारुपाला आली आहे, असे सांगून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg